नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी 22 तारखेला आंदोलनाची हाक दिली होती. मात्र आचारसंहितेमुळे परवानगी नाकारण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं आहे. 25 तारखेला या विमानतळावरून व्यावसायिक सेवा सुरू होणार असून त्या संदर्भात निषेध करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारने आपला शब्द पाळला नाही अस ते म्हणाले.