खुलताबाद तालुक्यातील ममनापुर फाट्याजवळ भीषण कार अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार (क्रमांक एम.एच. ४० ए.सी. ४३७३) ने म्हैसमाळ येथे दर्शनासाठी जाऊन परतीच्या प्रवासात हे चौघे म्हैसमाळ येथून खुलताबाद मार्गे फुलंब्रीकडे निघाले होते. दरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याखाली उतरून झाडावर जोरात आदळले. या अपघातात सोमिनाथ लक्ष्मण पाल्हाळ (वय ३३, रा. आपेगाव, ता. गंगापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.