भावड येथील शिव मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ परिसरात संतापाची लाट उसळली असून, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर वारंवार होणारे असे हल्ले कदापि खपवून घेतले जाणार नाहीत," असा सज्जड इशारा देत त्यांनी प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ऊद्या सकाळी १० वाजता भावड ते अड्याळ पोलीस स्टेशन असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे भोंडेकर यांनी जाहीर केले आहे.