बारावीची बोर्ड परीक्षेला आज दि १० फेब्रुवारीला सुरूवात झाली असून खुलताबाद तालुक्यात इंग्रजी विषयाची परीक्षा शांततेत पार पडली. तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकूण सुमारे ४ हजार ५० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक केंद्रावरील सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवण्यात आले होते.