आरोग्य विभाग,जिल्हा परिषद जळगाव
जळगाव :~'यंग इंडिया – फिट इंडिया” उपक्रमाअंतर्गत “सुपोषण जळगाव अभियान” सुरू करण्यात आले असून या अभियानाचे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाला संतुलित आहार, आवश्यक पोषकतत्वे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचवणे आहे.
मा.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर यांच्या नियंत्रणाखाली शालेय विद्यार्थ्यांमध्ये रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली असता अनेक विद्यार्थ्यांमध्ये साखरेचे प्रमाण वाढलेले आढळून आले आणि बदलत्या आहारशैलीमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांचा स्पष्ट इशारा मिळाला. याच वास्तवाने प्रेरित होऊन केंद्र शासनाच्या “यंग इंडिया फिट इंडिया” उपक्रमाअंतर्गत “सुपोषण जळगाव अभियान” सुरू करण्यात आले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने एक गाव दत्तक घेऊन दर्शनेवारी सायकलिंग योगा सूर्यनमस्कार प्राणायाम ध्यानधारणा मॅरेथॉन पारंपरिक व्यायाम प्रथिनयुक्त पाककृती स्पर्धा, शुगर