राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची बदनामी प्रकरणी पोलिसांची तात्काळ कारवाई; आरोपी महिलेवर गुन्हा दाखल सोशल मीडियाच्या गैरवापरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला पदाधिकाऱ्याची बदनामी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्याने आज दुपारी ठीक एक वाजता तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उद्योजिका असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आहेत.