चाळीसगाव (महाराष्ट्र): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्यावर तीव्र आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत, वंचित बहुजन आघाडी (VBA) च्या चाळीसगाव शहर कार्यकारणीने त्यांच्या त्वरित अटकेची मागणी केली आहे. अटकेची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने चाळीसगाव पोलीस प्रशासनाला दिला आहे.