राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमधील नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी नागपूर महानगरपालिकेतील स्थितीवर भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे.