वडगाव कोल्हाटी गट क्र. ५० मधून ललिता सोनवणे यांचा विजय
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 9, 2026
आज दिनांक 9 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी गट क्रमांक ५० मधून शिवसेना (ठाकरे गट)च्या उमेदवार ललिता सोनवणे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला. विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा विजय केवळ माझा नसून सर्व कार्यकर्ते, मतदार आणि समर्थकांचा असल्याची भावना व्यक्त केली. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विकासाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.