बुलढाणा: छत्रपती शिवरायांना अभिवादन करून नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना उमेदवार पूजा संजय गायकवाड यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ
बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार पूजा संजय गायकवाड तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन करून करण्यात आला आहे.यावेळी आ.संजय गायकवाड यांनी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसरात दणाणून सोडला होता.बुलढाण्याच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता,वाहतूक, नागरिक सुविधा आणि नवे विकास प्रकल्प अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध राबवू असे अभिवचन दिले.