लाखनी: थंडीमुळे जिवाभावाचा जीव गेला! लाखनी येथील दुर्देवी घटना; पोलीस तपास सुरू
लाखनी शहरातील मौजा सिंधीलाईन येथे दिनांक ३०/११/२०२५ च्या सायंकाळी ५:०० वाजल्यापासून ते दिनांक ०१/१२/२०२५ च्या पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास जितेद्र हरीभाऊ परतेकी (वय ३५, रा. मेढा/सोमलवाडा) यांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बरी नसल्याने जितेंद्र परतेकी यांनी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले होते व डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी न परतता रात्रभर बाहेरच होते, ज्यामुळे प्रचंड थंडीच्या तडाख्याने त्यांचा अंत झाला.