आज दिनांक 7 फेब्रुवारी सकाळी आठ वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठ्या संख्येने मतदानासाठी हजेरी लावली. आपण स्वतः मतदानाचा हक्क बजावला असून प्रत्येक नागरिकानेही आपला मतदानाचा अधिकार जरूर बजवावा, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी केले. यंदा पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी मतदानासाठी दिसत असून मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच जनतेचा कौल आम्हालाच मिळेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.