बुलढाणा: सायबर फसवणूक प्रकरणी चैन्नई आणि सुरतमधून 2 आरोपींना अटक,बुलढाणा सायबर पोलिसांची कारवाई
‘टेलिग्राम’ एपवर टास्क देवून पैसे कमविण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी मलकापुरातील एका दाम्पत्याची लाखो रुपयांनी फसणूक केली. या प्रकरणातील 2 आरोपींना बुलढाणा सायबर पोलिसांनी अटक केली असून यातील एकाला चैन्नई येथील सेंट्रल जेलमधून तर दुसऱ्याला गुजरातच्या सूरत शहरातून अटक करण्यात आले आहे.