आज दि दोन फेब्रुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे भर सभेमध्ये अब्दुल सत्तार यांचा मतदारांना धमकी देणारा असल्याचा दावा करण्यात येणारा व्हिडिओ ऐकवला. या व्हिडिओमध्ये “मतदारांची नावं मला चिठ्ठीत लिहून द्या, मग मी बघतो काय करायचं ते” असे विधान असल्याचा दावा दानवे यांनी केला. या घटनेमुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली असून, निवडणूक काळात