सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी रोजी १६९ अर्जांची विक्री झाली.दोन दिवसांत एकूण ३७९ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे समोर आले आहे.चिंचोली लिंबाजी गटातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटांमध्ये एकूण ६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.यामध्ये नागद, करंजखेडा, चिंचोली लिंबाजी, पिशोर, कुंजखेडा, जेहुर, देवगाव व हतनूर या गटांचा समावेश आहे.