रविवार दिनांक 8 फेब्रुवारीला दुपारी सुमारे 3.10 वाजताचे दरम्यान रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत चिचदा उपवन क्षेत्रातील मानेगाव बीट मधील कक्ष क्रमांक २९२ पीएफ मुरडा परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात सौ. सुलोचना राजकुमार भलावी वय अंदाजे 35 वर्ष रा. उमरी हिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी रामटेक राहुल शिंदे यांनी दिली. तर तिचे पती राजकुमार भलावी, वय 40 वर्ष रा. उमरी हे किरकोळ जखमी झाले आहेत.