चाळीसगाव: प्रभाग १० मधील जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार मंगेश चव्हाण यांचा विकासाचा निर्धार!
चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जाहीर सभेला कडाक्याच्या थंडीतही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री ९ वाजता हजारो नागरिक, माता-भगिनी, हमाल बांधव व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन अधिक दृढ केले.