बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेतून १ लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना उघडकीस आली आहे. फिर्याद सीमा शालीकराव कालेजवार (रा. पांडव वॉर्ड, भद्रावती) ही महिला चंद्रपूर येथे मुलीला भेटून सकाळी ११:३० वाजता चंद्रपूर-नागपूर बसने भद्रावती येथे उतरल्या. बॅगेची तपासणी केली असता, सोन्याचे दागिने लंपास केल्याचे आढळून आले. त्यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार केली.