महाबळेश्वर पंचगणी येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप प्रो लीग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत नागपूर जिल्ह्याच्या रामटेक येथील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत पदके मिळवली. या विजेत्या खेळाडूंचे रामटेक येथे बुधवार दिनांक 4 फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान आगमन होताच बस स्टॅन्ड येथे डीजे वाजवून पुष्पगुच्छ देऊन,गुलाल उधळून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नंतर येथून भव्य मिरवणूक निघून डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक वरामटेक शहरात फिरवण्यात आली.