सिंदखेड राजा: लभाण देव मंदिराजवळ कार-दुचाकी अपघातात एक जण ठार, एक जण गंभीर जखमी
सिंदखेडराजा शहरापासून काही अंतरावर असलेल्या लभाण देव मंदिराजवळ २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार-दुचाकी अपघातात एक वृद्ध ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.तुकाराम अर्जुन गवई असे मृतक वृद्धांचे नाव आहे विनोद शिवाजी गवई गंभीर जखमी असून याप्रकरणी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.