बुलढाणा: पुण्यावरुन निघालेल्या ट्रॅव्हल्स बस मधून 3 लाखांच्या कपड्यांची 2 बॅग चोरी,बस शहर ठाण्यात जमा
बुलढाणा शहरातील एक तरुणी पुण्यावरुन संगीतम ट्रॅव्हल्स मध्ये बुलढाण्याच्या दिशेने प्रवासाला निघाली होती.तिने जवळपास 3 लाखाचे कपड्यांची 2 बॅग बसच्या डिक्की मध्ये ठेवले होते.आज सकाळी बस बुलढाण्यात पोहोचल्यानंतर डिक्कीत दोन्ही बॅग दिसले नाही.याबाबत तिने बस चालक आणि वाहकाला विचारपूस केली. त्यांनी हात झटकले.त्यामुळे संतप्त तरुणीने बस बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांना सविस्तर घटनाक्रम सांगितले. पोलिसांनी बस ठाण्यात जमा करून घेतली आहे. याबाबत तपास सुरू आहे.