शहरातील शाहूनगर मैदान परिसरात झालेल्या वादातून तरुणावर जातीवाचक अपमान व मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता कलम १२६(२), ११८(१), ३(५) तसेच अतिविषयक अत्याचार प्रतिबंधक कायदा ३(१) (१) (1), ३(२) (रि) अन्वये नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी संकेत किशोर कोंडेकर (वय २४, रा. भीमनगर, गेवराई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेवराई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस करत आहेत