जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा विद्यमान खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांनी खासदाराने निधी कीती आणला यावरुन टीका केली होती, त्यावर काळे यांनी पलटवार करुन दानवे यांना सुनावले. गुरुवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता खा. डॉ. कल्याण काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दिल्लीवरुन येणारे जे बजेट आहे, ते काय रावसाहेब दानवे आणतात का? ते सभागृहात बसतात का? असा सवाल काळे यांनी केला असून दानवे हे लोकांची दिशाभुल करीत आहे.