धरणगाव: सावदा शहराच्या विकासासाठीच भाजप शिवसेनेची युती: भाजपचे निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन यांची पत्रपरिषदेत माहिती#
"सावदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आणि शिवसेनेने युती केली असून जनता नक्कीच आम्हाला कौल देईल !" असे प्रतिपादन भाजपचे निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन यांनी केले. बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत त्यांनी युतीची भूमिका जाहीर केली.