जालना: नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात पुन्हा चार आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले; आर्थिक गुन्हे शाखेची माहिती
Jalna, Jalna | Sep 15, 2025 जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडून नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात कारवाई सुरू असून आज पुन्हा चार आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळले. अशी माहिती सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय. शासनाने सन 2022, 2023 व 2024 मध्ये अतिवृष्टी, पूर, नापिकी, अवेळी पाऊस आणि दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना अनुदान वाटप करण्यासाठी वेळोवेळी चार शासन निर्णय निर्गमित केले होते. मात्र सदर प्रकरणात शासकीय निधीचा अपहार केला होता.