रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिंधीटोला (झिलमिली) येथील १४ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाला आहे. त्याला अज्ञात व्यक्तीने आमिष देऊन पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रावणवाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास तो मुलगा कबड्डी पाहण्यासाठी चिरामणटोला येथे जाण्याचा आग्रह करू लागला. त्यावेळी आईने ‘शाळेत जा, खेळ पाहायला जाऊ नको’ असे समजावल्यावर मुलगा रा