सांगोला: म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्याची आमदार बाबासाहेब देशमुख यांची जलसंपदा मंत्री यांच्याकडे मागणी
सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणीचे पत्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दिले. तालुक्यातील सुमारे ३०ते३५ गावे यात येत असून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीवर १९ बंधार्यांवर अवलंबून असणाऱ्या १९०० ते २००० हेक्टर जमिनीसाठी पाणीसाठा कमी क्षमतेने असल्याने सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी तात्काळ सोडण्याची मागणी त्यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याचं ते म्हणाले.