लग्नासाठी वधू देण्याचे आमिष दाखवून तातडीने लग्न लावून दिले गेले. लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने, नव्या साड्या घेऊन त्याच दिवशी रात्री नववधू व करवली पळून गेल्याचा प्रकार मुरंबी (ता.अंबाजोगाई) येथे उघडकीस आली. संबंधितांनी फसवणूक केल्याचा गुन्हा बर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील वधू, तिची आई, बहीण, मामा हे मुरंबी येथे एका कुटुंबाकडे आले. या सर्वांनी कुटुंबातील मुलाला लग्नासाठी मुलगी देण्याचे आमिष दाखविले. बोलणी झाल्यावर तातडीने लग्न करून दिल