साकोलीतील नवजीवन विद्यालयात मुख्याध्यापकांच्या सभेत कॉफी मुक्त अभियानात शिक्षणाधिकारी रवींद्र साठवणे यांनी केले मार्गदर्शन, साकोली येथील नवजीवन नवजीवन विद्यालयात कॉफी मुक्त अभियान व परीक्षा पे चर्चा यावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय सचिव मंडळ नागपूर बोर्डचे रवींद्र सोनटक्के यांनी गुरुवार दि5 फेब्रुवारीला मार्गदर्शन केले.तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा गजभिये यांनी विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात व कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी या बैठकीचे संचालन केले या सभेला कस्टोडियम हरीश भोवते, केंद्रप्रमुख यादवकांत ढवळे, केंद्र प्रमुख सुरेंद्र उके उपस्थित होते