चाळीसगाव: आप'चे उमेदवार ॲड. राहुल जाधव यांचा 'दिल्ली मॉडेल'वर भर; चाळीसगावसाठी 'मानवकेंद्रित विकास'चे व्हिजन!
चाळीसगाव: आगामी चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) ने 'दिखाऊ विकास'ला नकार देत, दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर 'मानवकेंद्रित विकास' करण्याचे आश्वासन दिले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. राहुल भिमराव जाधव यांनी 'विकास म्हणजे काय?' हा मूलभूत प्रश्न उपस्थित करत, सामान्य माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारा विकास करण्याचे व्हिजन मांडले आहे.