भुदरगड: गारगोटी शहरात रस्त्यावर कचरा टाकला तर लागेल हजार रुपयांचा दंड कचरामुक्त गारगोटी अभियान सुरू.
गारगोटी (ता. भुदरगड) येथे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात ग्रामपंचायतीने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. सरपंच प्रकाश वास्कर, उपसरपंच प्रशांत भोई यांच्या नेतृत्वाखाली परिपत्रक जारी करून रिक्षातून दवंडी दिली जात आहे. अशी माहिती आज सोमवार २१ जुलै दुपारी दीडशे दरम्यान सरपंच प्रकाश वासकर यांनी दिली.