अकोट: पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी खानापूर वेस परिसरातून देशी कट्टा व चार जिवंत काडतुससह आरोपीस ताब्यात घेतले
Akot, Akola | Nov 30, 2025 निवडणूक अनुषंगाने शहर पोलीसांचे डीबी पथक पेट्रोलिंग वर असताना गुप्त माहिती मिळाली की एक युवक खानापूर वेस ते राजेंद्र नगर रोडवर देशी कट्टा अग्निशस्त्र जवळ बाळगून फिरत आहे. पोलिसांनी पंचा समक्ष यावेळी फिरणाऱ्या या आरोपीस ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक देशी कट्टा व चार जिवंत काढतुस मिळाले.त्यास परवाना बाबत विचारणा केला असता परवाना नसल्याने देशी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करून आरोपी रोहन मुरलीधर अंभोरे वय 20 वर्षे राहणार राजेंद्र नगर खानापूर वेस यास ताब्यात घेतले.