चाळीसगाव : महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक,आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा चाळीसगाव शहरात उभारण्यात यावा, अशी मागणी छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाने केली आहे. या मागणीचे लेखी निवेदन मंडळाच्या वतीने दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक सौरभ जोशी यांना देण्यात आले.