चाळीसगाव: येथील नगर परिषदेची निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर आता संपूर्ण चाळीसगाव शहराचे लक्ष २१ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, नागरिकांमध्ये विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चर्चांचा जोर वाढला: मतदान संपताच चाळीसगावातील चौकाचौकांत, चहाच्या टपऱ्यांवर, बाजारपेठेत आणि वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या गप्पांचे विषय बदलले आहेत.