सांगोला: हॉस्पिटलमध्ये हाणामारीचा थरार! मृत रुग्णाच्या नातेवाइकांचा संताप अनावर
हलगर्जीपणामुळे वृद्ध सासऱ्याचा मृत्यू झाल्याचा संशयावरून संतप्त नातेवाइकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून टेबलवरील काचेची तोडफोड केली. एवढ्यावर न थांबता डॉक्टरला मारहाण केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉस्पिटलसमोर पोलिसांचा बंदोबस्त होता. घटनेनंतर संबंधित डॉक्टर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले. परंतु, मृताचे नातेवाईक आणि संबंधित डॉक्टर यांच्या चर्चेतून तोडगा निघून प्रकरणावर पडदा पडला आहे.