शिरूर: शिरूरमध्ये तडीपार आदेशाचा भंग; दोघे पोलिसांच्या जाळ्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची निमोणे येथे कारवाई
Shirur, Pune | Nov 27, 2025 शिरूर तालुक्यातील दोन युवकांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन करून गावामध्ये प्रवेश केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.रोहित प्रमोद कर्डिले आणि दिपक दत्तात्रय जाधव अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.