सांगोला: मालवाहतूक वाहनांची महूदमध्ये जोरदार धडक; टू-व्हीलरचा चक्काचूर, महिला रुग्णालयात
तालुक्यातील महूद-कराड रस्त्यावर मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. महूद परिसरात मालवाहतूक कंटेनर व ट्रकमधील झालेल्या जोरदार धडकेत रस्त्यावर उभ्या असलेल्या टू व्हीलर गाडीचा चक्काचूर झाला.अपघात एवढा भीषण होता की कंटेनरमधील पार्ट्स रस्त्यावर विखुरले गेले.स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.