अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शेगाव शहर पोलिसांनी तीन पुतळे परिसर येथे २२ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजेदरम्यान पकडले. पोहेकॉ. गणेश वाकेकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तीन पुतळे परिसर येथे छापा टाकून संघपाल उर्फ अक्षय गोपाल शेगोकार वय 34 वर्ष रा.तीन पुतळे परिसर शेगाव यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारू च्या १६.नग शिष्या व वायरची थैली असा एकूण ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.