बुलढाणा: आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत ,३५० कोटी रुपये थेट बॅंक खात्यात जमा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित ५ लाख ६ हजार ८३१ नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यात ३५० कोटी रुपयांची मदत DBT द्वारे जमा करण्यात आली आहे.एकूण ५ लाख ९६ हजार १४५ शेतकऱ्यांसाठी ₹४१० कोटींचे सहाय्य मंजूर झाले आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई वितरण रखडले म्हणूनच सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ आपला Farmer ID तयार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.