वर्धा: बोरगाव मेघे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रास्ताविक जागेवरील अवैध अतिक्रमण अखेर हटवले!
Wardha, Wardha | Nov 19, 2025 वर्धा शहरालगतच्या बोरगाव मेघे येथील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (PHC) प्रास्ताविक जागेवरील अवैध अतिक्रमण अखेर आज, १९ नोव्हेंबर रोजी हटवण्यात आले आहे.असे रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे