बार्शी: “अंडाभुर्जीचे पैसे दे” म्हणताच संताप; रॉडने फोडला हल्ला; बसस्थानकासमोरील घटना
बार्शी येथील बसस्थानकासमोर अंडाभुर्जी व्यावसायिकाने पैसे मागितल्याच्या कारणावरून मद्यपीने लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत जखमी नितीन अभिमान खडतरे (वय ३४) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी आश्रू कारंडे (रा. फपाळवाडी, ता. बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी याचे बसस्थानकासमोर अंडाभुर्जी स्टॉल असून मद्यपान करून तो आला. खाल्ल्यानंतर पैसे मागितल्यावरून शिवीगाळ करत व्यावसायिकाला बेदम मारहाण केली.