चाळीसगाव वनक्षेत्र कार्यालयाच्या (Forest Range Office, Chalisgaon) पथकाने अवैध वृक्षतोड आणि विनापरवाना मालवाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पश्चिम जुवार्डी बीट अंतर्गत, करमूड-कुझर रस्त्यावर वन विभागाने सापळा रचून ४०७ मालवाहतूक वाहनातून (४०७) अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली लाखोंची लाकडं जप्त केली आहेत. या कारवाईमुळे वनसंपदेची चोरी करणाऱ्यांना मोठा झटका बसला असून, कुझर परिसरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीला आळा बसण्यास मदत होणार आहे.