लाबेला हॉटेल जवळील धोकादायक खड्ड्यात मालवाहू पडल्याने ३ जण जखमी झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.नांदुरा येथून शहराकडे येत असलेले मालवाहू वाहन क्र. एमएच-२८-बीबी-४५६४ हे लाबेला हॉटेल जवळील रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात पडले. सदर वाहन खड्ड्यात फसले असून या अपघातात गौरव संजय हागे वय २० वर्षे, रा. हिवरा , संदीप श्रीराम मुयांडे वय २६, वर्षे रा.आवार व बाळू रामदास इंगळे वय २४ वर्षे, हे तिघे जण जखमी झाले.