जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज दि ७ फेब्रुवारी रोज मतदान पार पडले.खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील ११८ वर्षांचे शंकर महादू श्रीखंडे आजोबा यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान करून लोकशाहीप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली. शंभरी ओलांडलेल्या वयातही आजोबांनी मतदान केंद्रावर स्वतः हजर राहून मतदानाचा हक्क बजावला