साकोली: बोरगाव येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी गावकऱ्यांचे सरपंचाना निवेदन, आंदोलनाचा दिला इशारा
साकोली तालुक्यातील बोरगाव आमगाव येथे शासकीय जागेवर तंटामुक्तीचे अध्यक्ष व ग्रामपंचायतचे चपराशी यांनी केलेले अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा ग्रामपंचायत समोर उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी बुधवार दि19 नोव्हेंबरला ला दुपारी तीन वाजता बोरगाव येथे घेतलेल्या ग्रामसभेत दिला आहे या मागणीच्या निवेदनाच्या प्रती सरपंचाना,तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देखील दिल्या आहेत चार दिवसात अतिक्रमण काढावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे