'स्कॉलरशिप प्रोजेक्ट ऑफ महादेवा' मोहिमेत रायगडमधील तीन उदयोन्मुख फुटबॉलपटूंची निवड महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि सिडको वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या 'स्कॉलरशिप प्रोजेक्ट ऑफ महादेवा' मोहिमेतून रायगड जिल्ह्यातील तीन उदयोन्मुख फुटबॉलपटूंनी असामान्य यश संपादन केले आहे. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय निवड चाचणीचे टप्पे पार करत श्रेया बिरादार, श्रावणी सावंत, आणि आलोकी पालवे या तीन मुलींची निवड झाली