बुलढाणा: दारू पिऊन शाळेत येणाऱ्या मोहना येथील मुख्याध्यापक निलंबित करणार!गुलाबराव खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी,बुलढाणा
मद्यधुंद अवस्थेत शाळेत गोंधळ घालणाऱ्या आणि शाळेतच दारू पिणाऱ्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून आजच संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.