आज दिनांक 6 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान नांदेड शहरातील सांगवी विमानतळ रोड, प्रभाग क्रमांक ३ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिक, युवक वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.