रामटेक: मानेगाव (उमरी) च्या घटनेनंतर आता देवलापार नजीकच्या सावरा कोर वनक्षेत्रात रानडुकराच्या हल्ल्यात 57 वर्षीय इसम ठार
Ramtek, Nagpur | Feb 9, 2026 रामटेक तालुक्यात मानव- वन्य प्राणी संघर्ष थांबण्याची कुठलीही चिन्ह आता दिसत नाही. 8 फेब्रुवारीला मानेगाव (उमरी) येथे अस्वलाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. अद्याप तिचा अंतिम संस्कारही व्हायचा असताना सोमवार दिनांक 9 फेब्रुवारीला सकाळी देवलापार जवळच्या सावरा येथील कक्ष क्रमांक 495 राखीव वन कक्ष क्षेत्रामध्ये सावरा निवासी सुरज भुरा धूर्वे वय 57 वर्ष यांच्यावर रानडुकराने भयानक हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना समोर आली आहे.