बुलढाणा: बुलढाण्यात कोणाला पाठिंबा द्यायचं याबाबत 2 दिवसात भूमिका स्पष्ट करू!अमोल रिंढे,मनसे ता.अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूक रिंगणात उतरलेली नाही, जिल्ह्यात एकही अधिकृत उमेदवार पक्षाने दिलेला नसल्याने मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तर कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा यासंदर्भात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या 2 दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मनसेचे बुलढाणा तालुका अध्यक्ष अमोल रिंढे यांनी आज दिली आहे.